


प्रतिनिधी. सत्यवान शिंदे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील आंबेओहोळ वस्ती मध्ये श्री गुरुदेव दत्त मूर्तीचा आठवा वर्धापन दिन सोहळा उत्साही वातावरणात गुरुवार दिनांक 3 /4/ 2025 रोजी संपन्न होणार आहे. नियोजनाप्रमाणे सकाळी पाच ते सात वाजता काकडी आरती, सकाळी नऊ ते अकरा वाजता जलाभिषेक होमहवन व धार्मिक विधी, सायंकाळी पाच ते सात वाजता हरिपाठ नेतृत्व ह भ प भागवत महाराज निर्मळ संत कृपा धर्मशाळा आळंदी सायंकाळी सात ते नऊ वाजता हरिकीर्तन आणि रात्री नऊ नंतर महाप्रसाद होणार आहे. रात्री दहा वाजता हरिजागरचा कार्यक्रम होईल. किर्तन रुपी सेवा ह भ प रामायणाचार्य पारस महाराज मुथा सुपा यांचे होणार असून सौजन्य श्री विलास बाळासाहेब चौधरी पा.(मा.सरपंच ),श्री हिरामण रखमाजी चौधरी (सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिले आहे. विशेष म्हणजे श्री बाबाजीशेठ रामचंद्र काळे यांची खेड आळंदी विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी रेटवडी ,खरपुडी निमगाव आणि पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आमंत्रित समस्त ग्रामस्थ आणि दत्त भक्त मंडळी आंबेओहळ वस्ती खरपुडी बुद्रुक तालुका खेड यांनी केले आहे