


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील नगर परिषदेने वाढवलेले अव्य ढव्य कर वाढ केल्यामुळे ॲड दिपक थिगळे यांनी राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील पाण्याच्या टाकी वरती जाऊन शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. यावेळी राजगुरुनगर शहरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी दीपक भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. कर वाढ रद्द झालीच पाहिजे. अशा घोषणा देत राजगुरुनगर शहरातील पाण्याच्या टाकी भोवतालचा परिसर दुमदुमला आहे. प्रशासनाने ताबडतोब कर वाढ रद्द करावी आणि योग्य न्याय द्यावा अशा प्रकारच्या मागण्या संतप्त नागरिकांकडून होत आहे. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ आणि पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे उपस्थित होते. हे एप्रिल फुल नसून सत्यतेमध्ये उतरवलेले ॲड दिपक थिगळे हे वाडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत.