


राजगुरुनगर:-
प्रतिनिधी. सत्यवान शिंदे
दि २६ शनिवार आज चांडोली संयोग मंगल कार्यालय येथे माननीय श्री राजेश नारायण जंगले साहेब शिक्षण विभाग. पंचायत समिती खेड विस्तार अधिकारी. पाईट बिट यांचा सेवा पूर्ती सोहळा संपन्न झाला खेड तालुक्यात शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षक सुरुवात झाली.खेड तालुक्यातील आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनावळे या गावात सुरुवात . दुर्गम भाग डोंगरी पश्चिम भाग यांची सुरुवात झाली होती. शिक्षण क्षेत्रात आवड आपुलकी जिव्हाळा प्रेम माऊली नावाचा जयघोष प्रत्येकाला माऊली संबोधन करून लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. प्रामाणिकपणा महत्त्वाचा गुण होता शिक्षण क्षेत्रात आवड प्रेमाने आपुलकीने शिक्षण कार्य सुरू केले निस्वार्थी भावना , नम्रपणा, विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ आपुलकीची भावना जाणवते. नंतर वाकी बु चाकण , जिल्हा प्राथमिक परिषद शाळा चांदू स. या गावात विविध प्रकारचे उपक्रम बौद्धिक विकास क्रीडा स्पर्धा. संगीत गायनाची आवड भजन स्पर्धा उपक्रम शाळेमध्ये यशस्वी केले.मुख्याध्यापक ते विस्तार अधिकारी 38 वर्ष सेवा पूर्ण केली खेड तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री अमोल जंगले साहेब, आंबेगाव तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी माननीय श्री जीवन कोकणे साहेब खेड तालुक्यातील सर्व पंचायत समिती शिक्षण विभाग, विषय तज्ञ दयानंद शिंदे, विस्तार अधिकारी पाईट बिट मधील प्रमोद पारधी संजय गोपाळे,सर्व केंद्रप्रमुख श्री बबन रेट वडे, साहेब किवळे, पाईट ,कोय, चांदुस, सर्व शिक्षक, महिला शिक्षिका, यांनी माननीय श्री राजेश जंगले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता त्यांचा सर्वांनी सत्कार केला चांदुस गावातील शाळा समिती व्यवस्थापक आजी माजी पदाधिकारी गोरख बढे, शिवाजी वाळुंज अशोक बडे, विक्रांत गुंजाळ, अशोक कारले, सौ अर्चना कारले (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) व योगेश म्हसे राजे शिवछत्रपती विद्यालय चांदुस मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकांचा कर्मचारी व गावचे सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पदाधिकारी यांनी त्यांच्या अभिनंदन केले आभार प्रदर्शन विश्वास राळे अशोक सावंत यांनी केले.कार्यक्रम संपन्न झाला