
प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरोली येथील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. हर्षवर्धन सोमनाथ सावंत( 254) , जान्हवी योगेश भालेराव( 250) ,परिणीती सचिन शिनकर (248 ), जान्हवी सचिन पवळे( 242), तनिष्का हरी कांबळे( 226 ),यश अभिजीत परदेशी( 216 ),वैष्णवी शशिकांत शेवाळे (206) गुण अशा पद्धतीने गुणसंपदा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव खेड तालुक्यात उंचावलेला आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून कल्पना पवळे यांनी केले. आदर्श मुख्याध्यापक राजेश कांबळे , सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ आणि शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.