
दि 03/05/2025 रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे आदेशाने अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सपोनि विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, रणधीर माने, सदानंद रुद्राक्षे व गोविंद डोके असे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *इसम नामे सलमान हसन सय्यद, वय 29 वर्षे, रा शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बँकेचे मागे, मंचर ता आंबेगाव जि पुणे व सनी विजय शहा, वय 21 वर्षे रा मावळे आळी, मौजे नारायणगाव, ता जुन्नर जि पुणे* हे संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन *एकुण 7,65,800/- किंमतीचा 11810 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, व इतर मुद्देमाल* असा माल जप्त करण्यात आला. त्यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क),20(ब)(ii)(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी,पोलीस अंमलदार मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, रणधीर माने, सदानंद रुद्राक्षे,गोविंद डोके व चाकण पोलीस स्टेशन कडील महेश कोळी,महादेव बिक्कड यांचे पथकाने केली आहे.