


प्रतिनिधी.लहु लांडे
आज सौरग्राम टेकवडी ता खेड गावात पर्याय प्रतिष्ठान, रोटरी क्लब राजगुरूनगर आणि ग्रामपंचायत टेकवडीच्या माध्यमातून आदर्श सरपंच प्रभावी व्याख्याते श्री भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. अतिशय मार्मिक उदाहरणाच्या माध्यमातून गावाचा शाश्वत विकास कसा करायचा याचे मार्गदर्शन त्यांनी केले. छोट्या गोष्टी पण त्या समाजाच्या हिताच्या कशा असतात असेअनेक प्रेरणादायी दाखले त्यांनी दिले व सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य व यशदा मार्गदर्शक श्री शरदभाऊ बुट्टेपाटील यांनी गावाला पर्यटन विकासासाठी तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला व असे प्रेरणादायी कार्यक्रम गावोगावी व्हावेत असे सुचविले व सरपंच विठ्ठल शिंदे , पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे यांच्या कार्याचे कौतुक केले.
श्री विजय वरूडकर, सी. एस.आर. मार्गदर्शक पुणे यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन आवर्जून उपस्थित होते,कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ महिला,युवक यांची लक्षणीय उपस्थिती होती.
सरपंच श्री विठ्ठलभाऊ शत्रुघ्न शिंदे, उपसरपंच श्री ज्ञानेश्वर बेंडुरे तसेच गावातील ग्रामस्थांनी पाहुण्यांचे ढोल आणि पारंपरिक वाद्य यांच्या माध्यमातून बैलगाडीतून मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री दिलीपराव बेंडुरे यांनी केले. गावातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या घरगुती जेवणाचा आस्वाद सर्व पाहुणे व ग्रामस्थांनी घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गावातील तरुण मंडळ, जेष्ठ नागरिक, महिला यांनी परिश्रम घेतले.
आभार प्रदर्शन दत्ता रुके, माजी अध्यक्ष रोटरी क्लब राजगुरूनगर यांनी केले.