

प्रतिनिधी. रोहित पाटील
दि १९/०५/२०२५ रोजी रात्री ससून हॉस्पिटल येथून इसम नाव बंटीसिंह परमार हा मयत झाले बाबत एम एल सी नं 14695/2925 अन्वये प्राप्त झाली. त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन अ.म नंबर 47/25 बी एन एस एस कलम 194 अन्वये दाखल करण्यात आले.
2. वरील प्रमाणे दाखल अकस्मात मयताचा तपास करता यातील मयत इसम नामे बंटी सिंह परमार, रा.मध्यप्रदेश व आरोपी रामबाबू जाटव,रा.मध्यप्रदेश याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिनांक 14/05/2025 रोजी रात्री 11.45 वाजता चे सुमारास बंटी सिंह परमार हा झोपेत असताना आरोपी नामे रामबाबू जाटव याने लाकडी फळीने त्याचे तोंडावर जोरजोराने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
3. त्यास प्रथम आस्था हॉस्पिटल चाकण व नंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार कामी दिनांक 17/05/2025 रोजी दाखल केले. ससून हॉस्पिटल पुणे येथे त्यावर उपचार चालू असताना तो दिनांक 19/05/2025 रोजी मयत झाला आहे.
4. सदर अकस्मात मयताचे चौकशीत प्रत्यक्षदर्शी व इतर साक्षीदार यांच्याकडे तपास करता आरोपी नामे रामबाबू जाटव याने यातील मयत नामे बंटी सिंह परमार याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025 बी एन एस एस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. गुन्ह्यातील आरोपी नामे रामबाबू जाटव याचे शोधकामी पोलीस स्टेशन कडील दोन पथक रवाना करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.