
प्रतिनिधी.लहु लांडे
आज दि 20/05/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड कडील आम्ही स्वतः व पो. उप निरीक्षक सुनिल जावळे व अंमलदार असे म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार 2718 सुर्यवंशी व पो शी 1940 हनमंते* यांना मिळालेल्या माहितीवरुन इसम नामे *बाळू बबन गाळव वय 65 वर्षे, रा कोरेगाव खुर्द ता. खेड जि. पुणे* यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन *एकुण 1401250/- किंमतीची 28 किलो वजनाची गांजाची झाडें* व 25 ग्रॅम गांजा, हा त्याच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातुन हा अंमली पदार्थाचा माल जप्त करण्यात आला. त्याचेविरुध्द *महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु र नं 306/2025 एन.डी.पी.एस. ऍक्ट 1985 चे कलम 8(ब ),8(क), 20(ब)(ii)(अ), 20(क)* प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.