
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ओव्हाळ गुरुजी यांनी आपले प्राथमिक आणि डीएड चे शिक्षण पूर्ण केले होते. एक आदर्श मुख्याध्यापक, पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित होते. अनेक विद्यार्थ्यांची आयुष्य घडविण्यात त्यांनी आपला जीवन काल व्यतीत केला.
सरकुंडी गावचे माजी आदर्श शिक्षक कालकथित रामचंद्र संभाजी ओव्हाळ गुरुजी यांच्या शोक सभेच्या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील अनेक मान्यवरांची आदरांजली संपन्न होत असताना जागतिक कीर्तीचे रांगोळीकार श्री महादेव गोपाळे यांनी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून ओव्हाळ गुरुजी यांचे रंगांच्या माध्यमातून सुंदर चित्र साकारले आणि पांगरी येथे एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी ते सुंदर बोलके चित्र ओव्हाळ गुरुजी यांचे सुपुत्र डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ यांच्या हाती सुपूर्द केले या प्रसंगी ते भावुक झाले. सदर प्रसंगी अखंड महाराष्ट्राला प्रबोधन करून ज्ञानदान देणारे आणि नुकताच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले कळमोडी गावचे सुपुत्र सुधाकर अभंग व जन संवाद न्यूज पुणे चे सह संपादक सुनील वाघचौरे, तसेच श्री महादेव गोपाळे यांच्या पत्नी मंगल, मुलगी पल्लवी, जावई विवेक कदम यांच्या उपस्तितीमध्ये ते चित्र सुपूर्द करण्यात आले.
कळमोडी गावचे सुपुत्र असणाऱ्या जागतिक कीर्तीच्या या महान कलाकाराला व त्यांच्या जागतिक कार्याला ओव्हाळ कुटुंब आणि आप्तेष्टांच्या वतीने मानाचा सलाम!
प्रतिनिधी : सत्यवान शिंदे