

प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथील माजी सभापती मंगलताई संजय गायकवाड यांचा 32 व्या विवाह वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला. यावेळी जवाहर विद्यालय चास या विद्यालयातील 1990 / 91 बॅच एस एस सी वर्गातील गणपत राक्षे ,संतोष बुट्टे सर मारुती राऊत समाधान ठोके अनिल राहाने ,बेबी गायकवाड, माया राक्षे, संगीता ठोके, कुंदा नाईकरे, वैशाली चासकर, विजय गायकवाड यांनी सर्वांनी सभापती मंगल ताई यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या. यावेळी खरपुडी गावचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. चेअरमन जयसिंगशेठ भोगाडे, ,मा चेअरमन संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते निलेश सुपेकर, ऋषी भाऊ काशीद यांनी सर्वांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.आलेल्या सर्वांचे पुणे जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष राकेश कदम यांनी आभार मानले. मा. सभापती मंगलताई गायकवाड यांनी केक वगैरे न कापता, डीजे चे गाणे न वाजवता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन लग्न वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. शैक्षणिक साहित्य देऊन अशा या आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा लग्न वाढदिवस साजरा केल्यामुळे खरपुडी गावातूनच नव्हे तर पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे. मा. सभापती मंगलताई गायकवाड यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे स्पष्ट मत श्रीधर चौधरी मामा यांनी व्यक्त केले आहे. यावेळी खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी स्नेहभोजनाने लग्न वाढदिवसाच्या समारोप करण्यात आला.