
मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
दि 24/05/2025 रोजी वपोनि संतोष पाटील, सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे बावधन येथील पाषाण सुस रोडवर पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पाषाण सुस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिचे कल्याणी कलेक्शन नावाचे दुकानामध्ये व राहते घरामध्ये तीचे साथीदारांसह गांजाची विक्री करीत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकुन इसम नामे 1. उमेश सुर्यकांत देशपांडे, वय 56 वर्षे, रा शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट क्र 7, पाषाण सुस रोड, पुणे, 2. अभिषेक विकास रानवडे, वय 32 वर्षे, सध्या रा बालाजी निवास, हनुमान मंदिराचे बाजुला, पाषाण सुस रोड, पुणे मुळ रा 620/21 अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराचे जवळ, दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे, 3. महिला नामे ऐश्वर्या अभिषेक रानवडे/ऐश्वर्या निलेश देशपांडे, वय 22 वर्षे, रा सदर यांचे ताब्यातुन एकुण 11,27,700/- रुपये किंमतीचा 20 किलो 736 ग्रम गांजा हा अंमली पदार्थ, 03 मोबाईल व 700/- रुपये रोख रक्कम असा माल जप्त करुन त्यांचे विरुध्द बावधन पोलीस स्टेशन गु.र.क्र. 213/2025 एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त्)(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हि गुन्हा दाखल झालेपासुन ती पुण्यातुन परागंदा झाली होती.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी पाहिजे आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिचा शोध घेणेकामी सपोनि विक्रम गायकवाड यांचे न नेतृत्वात एक पथक नेमले होते. सदर पथकाने स्थानिक बातमीदारांचे मदतीने माहिती घेवुन व तांत्रिक विश्लेषण वरुन आरोपी नामे कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हि आंध्रप्रदेशामध्ये असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार लागलीच तपास पथक आंध्रप्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्हयातील राजनगरम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येथे जावुन सापळा लावुन सदर महिलेस ताब्यात घेवुन तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिस दाखल गुन्हयाचे पुढील तपासकामी बावधन पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिचेवर यापुर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) हवेली पोलीस स्टेशन 01/2005 भारतीय दंड विधान 302
2) डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.क्र. 3035/2007 भारतीय दंड विधान 457
3) चत:श्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 393/2007 भारतीय दंड विधान 344, 366, 438
4) चत:श्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 3300/2008 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124
5) चत:श्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 101/2013 भारतीय दंड विधान 420, 438 व पिटा अॅक्ट
6) डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.क्र. 3026/2013 पिटा अॅक्ट 3, 4, 5, 7
7) कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. 268/2016 पिटा अॅक्ट 3, 4, 5, 7
8) कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. 347/2016 पिटा अॅक्ट 3, 4, 5, 7 व मोका
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील,सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे,गणेश कर्पे यांचे पथकाने केली आहे.