
१ वर्षापासुन पाहीजे दि.१७/०६/२०२५ रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक, सुनिल जावळे, पोहवा/७५५ आढारी, पोहचा/८९३ सोनवणे, पोशि/२८७७ मेरगळ, पोशि/२२९६ जैनक, पोशि/२३९९ बाळसराफ असे अभिलेखावरील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना वरील नमुद पथकास मिळालेल्या बातमी नुसार म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.६५६/२०२४ मा.दं. वि. कलम ३२४ या गुन्हयामधील गेले एक वर्षापासुन पाहीजे असलेला आरोपी नामे शुभम सोमेश्वर मुंगळे, वय २० वर्षे, रा. कडाचीवाडी ता. खेड, जि. पुणे मुळ रा. तडखेल ता. वेगलुर जि. नांदेड यास निघोजे येथून ताब्यात घेवून त्यांचे अंगझडती मध्ये ०१ गावठी पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदर आरोपी विरुध्द पोशि/२८७७ रामदास यशवंत मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.३८४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोहवा/४५५ आढारी, पोहवा/८९३ सोनवणे, पोहवा/९१९ मोरे, पोशि/२८७७ मेरगळ, पोशि/२२९६ जैनक, पोशि/२३९९ बाळसराफ, पोशि/२८८३ काळे, पोहवा/नागेश माळी यांनी केली आहे.