खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पाऊण लाख विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड देऊन केले शाळेत

Spread the love
राजगुरूनगर : प्रतिनिधी सत्यवान शिंदे

खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पाऊण लाख विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड देऊन केले शाळेत स्वागत

खेड /तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी काळे यांच्या संकल्पनेतून शाळेचा पहिला दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आमदार काळे यांनी विद्यार्थी स्वागत पत्र बनवून प्राथमिक शाळेतील ३८००० विद्यार्थी व माध्यमिक शाळेतील ३७००० विद्यार्थ्यांना वाटप केले. त्यांनी स्वतः निघोजे व कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड दिले. त्यांच्या सुविद्य पत्नी आणि माजी सरपंच वैशाली काळे यांनी पाडळी येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी हितगुज साधत आमदार वेलकम कार्ड प्रदान केले.

त्यांच्या या उपक्रमाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, निघोजे सरपंच सुनीता येळवंडे, यांच्यासह पालक व शिक्षकांनी कौतुक केले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी असे अनोखे गिफ्ट भेटल्याने त्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेचा हा आनंददायी अनुभव बालकांच्या आयुष्यातील आनंददायी क्षण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents