
शिरवली/आरडब्ल्यूई कार्यक्रमांतर्गत आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी (तालुका मावळ, जिल्हा पुणे) यांच्या वतीने शिरोली गावात बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य व कृषी कार्यानुभव कार्यक्रम अध्यक्ष डॉ. जाधव सर आहेत.
या प्रात्यक्षिकात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बियाणे प्रक्रिया पद्धतींचे महत्त्व समजावून सांगितले गेले. मार्गदर्शक म्हणून कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत घाडगे तसेच कार्यक्रम अधिकारी बांगर मॅडम आणि नवलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरू आहे. बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिकात बीजामृत, गोमूत्र प्रक्रिया, थायरम प्रक्रिया, रायझोबियम प्रक्रिया तसेच गरम पाण्याची प्रक्रिया यांचे सविस्तर प्रात्यक्षिक कृषिकन्या स्वप्नाली शिंदे, नम्रता नरळे, केनिशा वकारे, श्रद्धा गायकवाड आणि विरश्री सांगळे यांनी उत्तम प्रकारे सादर केले.
गावातील कृषी सहायक मोहिनी सावंत आणि दिनेश सावंत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. गावातील शेतकऱ्यांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी शेतकऱ्यांमध्ये राजेंद्र सावंत, सुधाकर सावंत, लहू सावंत, चंद्रकांत सावंत, एकनाथ सावंत, सिताराम बेंढाले, चिमन बेंढाले, ज्ञानेश्वर सावंत, आनंद वाडेकर, विश्वनाथ पारे, रघुनाथ सावंत, रविंद्र सावंत, शंकर सावंत, विठ्ठल सावंत, किसन वाडेकर यांचा समावेश होता.