
दि.२५/०६/२०२५ रोजी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पो.हवा. सुद्रिक, पो. हवा. सांगळे व पो. हवा. भवर यांनी मौजे कवठे यमाई गावचे हद्दीत ता. शिरूर, जि.पुणे येथे अचानकपणे गावठी हातभट्टी निर्मितीवर यशस्वीपणे छापा टाकला. या कारवाईत एकुण १,१३,७७५/- रू. किंमतीचा माल ज्यामध्ये ३,२००/- लिटर गावठी हातभटट्टीचे कच्चे व जळके रसायन, हातभटट्टीची दारू, केमीकलयुक्त ताडी व इतर साधने असा माल जप्त करून ज्ञागीन नष्ट केला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरनं ४४८/२०२५ भा.न्या.स. कलम १२३ सह महा.प्रो.का.क. ६५ (क) (फ) प्रमाणे आरोपी नामे सागर गणपत गडगुळ, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि.पुणे याचे विरुध्द दि.२५/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण श्री. संदिपसिंह गिल (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सीा, शिरूर उपविभाग श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक पो.नि.श्री. संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुद्रिक, पोलीस हवालदार सांगळे व पोलीस हवालदार भवर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार बारे करीत आहेत.
गावठी हातभट्टी सारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणा-यांना शिरूर पोलीस प्रशासनाचे सुस्पष्ट आव्हान आहे की, त्यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा. अन्यथा, पोलीस प्रशासन कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही !