अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 मुख्य संपादक.लहुजी लांडे
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला नामे लीझा मकबूल शेख, रा. स.नं ४८/१/१६, फ्लॅट नं २, योगिनी निवास, आनंद पार्क, आंबेगाव खु. कात्रज, पुणे या वारंवार बांग्लादेश येथे जात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याबाबत खात्री करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे आंबेगाव पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता सदरची महिला पत्ता बदलून दुसरीकडे राहण्यास गेली असल्याची माहिती मिळाली. सदर महिलेबाबत गोपनीय माहिती काढून तीचा शोध घेतला असता सदरची महिला सिध्दीविनायक सोसायटी फ्लॅट नं ३१० आंबेगाव बु कात्रज पुणे या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर नारगे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी वपोनि शरद झिने, पोउपनि युवराज शिंदे यांनी अंमलदारांसह छापा टाकला असता महिला नामे लीझा मकबूल शेख मिळून आली. तसेच तीचेसोबत तिची बहीणी नामे रिंकी देवी व बहीणीचा पति प्रमोद कुमार चौधरी ग्राम फतेहपुर, पोस्ट सीनावों, थाना परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार हादेखील मिळून आला. सदर महिलेची विचारपूस करता त्यांनी भारतीय असल्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट व इतर कागदपत्रे सादर केली. त्यानंतर नमूद राहत्या घराची पथकाकरवी झडती घेतली असता महिला नामे लीझा मकबूल शेख हीचा बांग्लादेशचा पासपोर्ट मिळून आल्याने त्यावरून ती बांगलादेशी नागरिक असुन, तिचे नाव खातून तस्लीमा, वडीलांचे नाव मकबूल, पतीचे नाव मोफीजुर रेहमान (मयत) तसेच तिचे बहिणीचे नाव रिंकी देवी ऊर्फ खातुन तमीना मकबुल मोरल रा. गाव-चाँदपाडा, पोस्ट हमीदपुर, ठाणा-कोतवाली, राज्य. जैसुर, बांगलादेश असे असल्याने सदरची महिला बांग्लादेशी असल्याची खात्री झाली. तसेच नमुद बांग्लादेशी महिला रिंकी ऊर्फ तमीना हिने सोबत असणारा इसम नामे प्रमोद कुमार चौधरी ग्राम फतेहपुर, पोस्ट सीनावों, थाना परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार याचेसोबत विवाह केला असून त्यानेच नमुद महिलांना वरीलप्रमाणे बनावट ओळखपत्रे बनवून दिल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद तिघांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणून त्यांचेविरुध्द आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १३१/२०२५, भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१३) (अ) (ब), १२ (२) सह विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ चे कलम १४ अ (अ) (ब), १४ ब, १४ क प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्री. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले, पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार निलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्निल शर्मा, महिला पोलीस अंमलदार पूजा खवले यांच्या पथकाने केली आहे