


खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी, माजी पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन येथील माणिक चौकात करण्यात आले. या वेळी सरकारच्या विरोधात निषेध करून आंदोलन करण्यात आले
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, विजया शिंदे, मा.नगराध्यक्ष शेखर घोगरे.ऊर्मिला सांडभोर, सुभाष मांडेकर,शेखर पिंगळे, लक्ष्मण जाधव आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी संजय घनवट, शिवाजी वर्षे, गणेश नाणेकर, रामहरी आवटे, किरण गवारे, उत्तम गोगावले, पांडुरंग गोरे, स्वामी कानपिळे, अनिल गंभीर, अनिता झुझम, सुदाम कराळे, दिलीप तापकीर, बाळासाहेब ताये, अनिल मिसर, सुनील बोंबले, प्रेम जगताप. सुदाम बोत्रे आदी उपस्थित होते. शेखर पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक नाथा घार्गे यांना दिल्या.