



पांजरपोळ भोसरी l ३० जून २०२५
आज दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सौ.
मंगलताई शेवकरी (ओबीसी महिला अध्यक्ष, समाज भूषण पुरस्कार प्राप्त) यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ भोसरी येथील अंधशाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये कोरडे साहेब, राजश्री चौधरी, दिपाली शेवकरी, पंकज आहेर, विश्वनाथ शेवकरी आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली.
सदर उपक्रमामुळे अंधशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. सौ. मंगलताई शेवकरी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.