

राजगुरुनगर प्रतिनिधी : पुणे नाशिक महामार्गावरील महत्वाचे असलेले तसेच संपूर्ण खेड तालुक्यातील प्रत्येक गावागावात ज्या बसस्थानकातून बस सुटतात तसेच कायम गर्दीने फुललेले राजगुरुनगर बसस्थानक गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेले दिसत आहे, उन्हाळ्यात, फुफाटयाचा त्रास पावसाळ्यात गाळ, चिखल, डबकी याचा त्रास. हे आता नेहमीचेच होऊन बसले आहे, बाहेरून बस आता मध्ये आल्यानंतर नक्की उभी कुठे राहिल याचा थांगपत्ताच नसतो, आणि बसस्थानकात, साठलेली डबकी, (अगदी तळया सारखी अवस्था असलेली), चिखल, गाळातून बाजाबोजा, पिशव्या बॅगा सांभाळत एस टी पकडायची म्हणजे एक अग्निदिव्य पार पाडावे लागते आणि यांचा अनुभव घ्यायचाच असेल तर नक्कीच राजगुरुनगर बसस्थानकात यायला पाहिजे अशी चर्चा या बसस्थानकातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त होत आहे यातून प्रवाशांना बस पकडण्यासाठीची धावपळ ती वेगळीच, यातून हेच लक्षात येते की गेल्या काही वर्षांपासून राजगुरुनगर बसस्थानकाची अतिशय दुरावस्था होऊनही आगार प्रमुखांना, स्थानक प्रमुखांना याबाबत प्रवाशांच्या सेवेशी काही देणेघेणे नसल्याचेच वास्तव दिसून येत आहे, या बाबत अनेक तक्रारी करूनही तसेच अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही या दुरावस्थेबाबत आवाज उठवून ही जैसे थे परिस्थिती आहे, मात्र प्रवाशांना मात्र याचा मोठा त्रास होत असूनही फक्त तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे हे मात्र नक्की..
आमची बातमी पाहण्यासाठी आमचा नंबर व्हाट्सअप ग्रुपला ॲड करा 9766694886/9370612656