माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व बारावी जून – जुलै 2025 गुणपत्रिका आणि शालेय अभिलेखा वाटप संपन्न

Spread the love
पुणे
प्रतिनिधी चाकण
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व बारावी जून – जुलै 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षांचे गुणपत्रिका आणि शालेय अभिलेखा वाटप पुणे विभागीय मंडळ शिवाजीनगर, पुणे. 5. या ठिकाणी 7 ऑगस्ट गुरुवार रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले. यावेळी भोर, वेल्हा, खेड(राजगुरूनगर ),शिरूर ,मावळ, मुळशी ,पिंपरी चिंचवड, हवेली ,पुणे शहर ,पुरंदर अशा तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचारी यांनी येऊन आपापल्या शाळेच्या गुणपत्रिका ताब्यात घेतल्या. यावेळी एस.एस.सी. बोर्ड पुणे विभागीय मंडळाचे अधिकारी मॅडम पायल कराळे, उषा काकड ,कोमल आगलावे यांनी अगदी वेळेत सर्वांना गुणपत्रिका दिल्या आहेत . तसेच त्यांना मदत करण्यासाठी अनिकेत जोशी, अजिंक्य पारसे , सुरक्षा रक्षकांचे देखील  मोलाचे सहकार्य लाभले.  जून – जुलै 2025 गुणपत्रक (इयत्ता दहावी व बारावी)नेणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेळेत गुणपत्रक मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents