
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत चाकण, दिघी, बावधान, हिंजवडी परीसरात घडलेल्या दुकानफोडी गुन्हयांचा गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत असताना दि.३०/०७/२०२५ रोजी चा कण पोलीस ठाणे गु.र.नं.४०८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ) ३३४ (१) या गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने वरील नमुद पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी महाविर जोहरसिंग कुमावत वय ३८ वर्ष, रा. जहांगिर कॉम्पलेक्स, रुम नं.५१ ए विंग, मिरा रोड, ईस्ट मुंबई यास तळेगाव दाभाडे येथून कार नं. एम. एच ०४ डीबी ६६४८ सह ताब्यात घेवून त्याचे कार मध्ये २,९८,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीची सिगारेट माल चाकण पोलीस ठाणे गुन्हयातील मिळून आला आहे. दिघी पोलीस ठाणे हददीतील गुन्हयातील १,००,०००/- रुपयेचा सिगारेट मुददेमाल व बावधान पोलीस ठाणे हददीतील १,००,०००/- रुपयेचा सिगारेट मुददेमाल तसेच आरोपी कडून गुन्हयात वापरलेली कार व सिगारेट माल असा एकुण ९,९८,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीने व त्याचे पाहीजे आरोपी साथीदार नामे २) राजेश कदम रा.राठी रुम नं.३८, चारकोन भांब्रज चाळ, भांब्रेकर नगर कांदीवली मुंबई, तसेच ३) ओमसिंग (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व ४) महींद्रा मेघवाल रा. काशीमिरा मिराभाईंदर असे मिळुन पिंपरी चिंचवड हददीत चाकण, दिघी, बावधान, हिंजवडी पोलीस ठाणे हददीत व ठाणे शहर हददीत राबोडी पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सादर अटक आरोपी विरुदध यापुर्वी २०१७ पासुन एकुन सिगारेट चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत. तसेच गुन्हयातील पाहीजे आरोपी राजेश कदम याचेवर सन २०१२ पासुन २४ सिगारेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. ४०८/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३४ (१)
२) दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ३४२/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४ (१)
३) बावधान पोलीस ठाणे गु.र.नं. ३२९/२०२५ भा. न्या. सं.क. ३०५ (अ), ३३४ (१)
४) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ५८४/२०२४ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४(१)
५) राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर) गु.र.नं. ५८४/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३४(१)
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड चे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर सो, अपर पोलीस आयुक्त, सारंग आवाड सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार वाय.व्ही. आढारी, सचिन मोरे, संदिप सोनवणे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शेखर खराडे, सुंदर थोरात, नागेश माळी यांनी केली आहे.