
चाकण वाहतूक विभाग चे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.शंकर टामसे साहेब यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी, वाहतूक आघाडीच्या वतीने सदिच्छा भेट
चाकण वाहतूक विभाग चे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.शंकर टामसे साहेब यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी, वाहतूक आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री सचिन वाघमारे साहेब यांनी घेतली सदिच्छा भेट घेतली व श्री. टामसे साहेब यांच्या बरोबर चर्चा करत असताना चाकण माळुंगे व परिसरा मध्ये होणारी वाहतूक कोंडी तसेच रिक्षा चालक-मालक व प्रवासी वाहतूक करणारे अनेक वाहने या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा करत असताना श्री.सचिन वाघमारे यांनी बेकायदा वाहने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्याच्या आजूबाजूला बेशिस्त पार्किंग केलेले वाहने यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे सांगितले.त्यावेळी बोलत असताना टामसे साहेबांनी चाकण शहरांमध्ये पार्किंगच्या तारखेचे फलक लावून त्या ठिकाणी पार्किंगचे नियोजन केले आहे अशी माहिती दिली.यावेळी उपस्थित श्री. वैजनाथ मुगावकर पाटील आरपीआय
श्री नागेश शिंदे लोक जनशक्ती पार्टी श्री .विजय करगळ आरपीआय श्री .प्रमोद घोडके श्री. संभाजी रनशींग सौ .नलिनीताई चव्हाण समाजसेविका सौ प्रियंका ताई सुतार समाजसेविका तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते त्यावेळेस नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक माननीय श्री शंकर टामसे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन श्री. सचिन वाघमारे साहेब व वरील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार सत्कार सन्मान करण्यात आला
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र