स्वराज्य संघाच्या वतीने विश्वविक्रम कीर्तनकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांचा व त्यांच्या सर्व सहकारी टाळकरी, गायक, वादक यांचा सन्मान दिनांक 18/11/2022 रोजी जयहिंद पॅलेस नारायणगाव येथे संपन्न झाला.
यावेळी स्वराज्य संघाचे कार्याध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांचे १० वे वंशज माणिक महाराज मोरे, उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे सर, श्री जितेंद्र तात्यासाहेब गुंजाळ उपाध्यक्ष लाला अर्बन बँक, नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान संपन्न झाला.
यामध्ये गायक किरण बनकर, विठ्ठल पोपळघट, पंढरीनाथ डुकरे, चंद्रकांत निकम, विणेकरी ज्ञानोबा कुंजीर, संतोष गावडे, रोहिदास मांजरे, संतोष टाकळकर, नरसिंग सुरवसे, नितीन सुक्रे, हार्मोनियम माऊली वंडेकर, विशाल बांगर पखवाज, विठ्ठल जाधव चोपदार, सुहास नलवडे, रामदास होळकर सुभाष बेलवटे या टाळकऱ्यांना वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून मिडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
तसेच ॲड. किरण झुंजुर्के यांचा स्वराज्य संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वराज्य संघाचे खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, शिरूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये शामकांत निघोट, राजेश कान्हूरकर, सचिन उढाने दिलीप पवळे राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा संघटक डॉक्टर विशाल आमले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखाताई शिंदे, जुन्नर अध्यक्ष अनिल रोकडे, शिरूर अध्यक्ष विशाल दिघे, खेड उपाध्यक्ष संतोष टाकळकर, आंबेगाव तालुका संपर्कप्रमुख निवृत्ती लोखंडे लक्ष्मण चव्हाण, सपकाळ महाराज, प्रतिभा पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेगाव चे कार्याध्यक्ष प्रकाश बोराडे यांनी केले यावेळी माणिक महाराज मोरे, ॲड किरण झुंजुर्के, जितेंद्रशेठ गुंजाळ यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी छत्रपती शिवरायाची पूजा करून व मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली व छत्रपतींची आरती व पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती विजय गुंजाळ यांनी दिली
