
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी म्हाळुंगे चौकी हददीतील महीलेचा चाकुने गळा कापुन व दगडाने ठेचुन विद्रुप केलेल्या खुनाचे गुन्हयातील आरोपीस २४ तासाचे आत गजाआड
दिनांक २०/११/२०२२ रोजी दुपारी ४.३० वा. चे पुर्वी म्हाळुंगे चौकी हददीतील मौजे खराबवाडी ता.खेड जि.पुणे गावचे हददीत चाण्याचा मळा या ठिकाणी इसम नामे विनायक रेवजी खराबी यांचे मालकीची जमीन गट नंबर ३८६ मध्ये दक्षिण दिशेला असणारे ओढया लगतचे बांधावरील झुडपामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन वय वर्षे २२ ते २७ वर्षे वयोगटातील अनोळखी स्त्री चा चाकुने गळा कापुन व चेह-यावर दगड टाकुन तिचा खुन केला आहे. सदर बाबत म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १७८२/२०२२ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
नमुद गुन्हयातील अनोळखी मयत महीलेचा चेहरा पुर्णपणे ठेचून विद्रुप केल्यामुळे सदर मयताची ओळख पटत नव्हती सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व गुन्हे शाखा युनिट ३ याचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया टिम तयार करुन गुन्हा उघडकीस आण्ण्याकरीता मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या. मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणे बाबत चाकण, खराबवाडी परीसरात अधिक तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ कडील पथकाने सदर परीसरातील ९० सीसीटीव्ही चेक केले तसेच सदर महीलेची ओळख पटविण्याकरीता सदर परीसरातील
घरमालक घरभाडेकरु, कंपनीतील कामगार, सुपरवाझर, स्थानिक नागरीकांकडे सखोल चौकशी करीत असताना पोना / १४५६ ऋषिकेश भोसुरे व पोशि/ १९४० राजकुमार हनमंते यांना त्यांचे खास गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली की, सदर मयत महीला ही खराबवाडी येथील हनुमान मंदिराजवळील राहण्यास असून ती शनिवार रात्री पासून मिळून आलेली नाही तेव्हा त्या बाबत तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड गुन्हे शाखा युनिट ३ यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे सदर पोलीस पथकाने सदर महीलेच्या नातेवाईकांना संपर्क करुन सदर महीलेचे नाव निकीता संभाजी कांबळे वय २८ वर्षे, रा. खराबवाडी ता.खेड जि.पुणे मुळ रा. कवठा ता. उमरगा जि. उस्मानाबाद असे असल्याबाबत समजले तसेच सदर महीलेचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषात्मक तपास करुन घटनेच्या अगोदर सदर मयत महीलेस झालेले कॉल वरून संशयीत इसम राम कुंडलिक सुर्यवंशी वय ३९ वर्षे, रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर दापोडी पुणे याचा पुणे येथील सिम्बॉयसेस परीसरातून शोध घेवून त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता प्रथमतः त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून सदरचा मयत व्यक्ती ही माझी जवळीची मंत्रिण असून तिला कोणी मारले ? असा कांगावा करुन दुखः झाल्याचे भासवुन मोठमोठयाने रडून तपास पथकाची पुर्णपणे दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु युनिट ३ कडील तपास पथकाने संशयीत आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास केल्याने संशयीत आरोपी याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली त्याने माहीती दिली की, सदर मयत महीला निकीता कांबळे हीचे व आरोपीचे पुर्वी एकत्र ऐलप्रो मॉल चिंचवड मध्ये काम करीत असताना ओळख होवून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी निकीता कांबळे हीचे अजुन कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत आरोपी राम सुर्यवंशी यास संशय आला तसेच राम सुर्यवंशी यांचे लग्न झाले असल्यामुळे त्याचे घरातील लोकांना सदर प्रेमसंबधा बाबत माहीती झाली होती त्यामुळे राम सुर्यवंशी याची पत्नी त्याचे सोबत बोलत नव्हती तसेच निकीता कांबळे देखील त्याचेशी न बोलात दुर्लक्ष करीत होती त्यामुळे रागाचे भरात निकीता कांबळे हीचा खुन केल्याची धक्कादायक कबुली दिली.
अशाप्रकारे अनोळखी मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट ३ कडील पोलीस
अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन व माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर केला तसेच अचुक तांत्रिक विश्लेषण केले परीणामी सदरचा क्लीष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीस म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, मा. पोलीस उप
आयुक्त (गुन्हे) श्रीमती. स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक अंकुश लांडे, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ, TAW नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.
( श्रीमती स्वप्ना गोरे) पोलीसउप आयुक्त (गुन्हे)
पिंपरी चिंचवड