शाईन ट्रेडींग या बनावट कंपनीने घातला 6,39,236 रुपयांचा गंडा
खेड पोलीस स्टेशन हद्दीत संगीता राजेश मुळे वय 30 वर्षे धंदा गृहिणी राहणार पडळवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांना
शाईन ट्रेडींग, अकाउंट नंबर 042663300006202 या अज्ञात अकाउंट धारकाने मला प्रोडक्ट बुस्टिंगच्या कमिषनचे अमिश दाखवुन वालमार्ट प्रोडक्ट बुस्टींग करण्यासाठी वालमार्ट या अॅप्लिषषव्दारे एकुण 6,39,236 /- एवढी रक्कम शाईन ट्रेडींग या कंपनीचे वरील अकाउंटवर ट्रान्सफर करण्यास सांगुन अचानक माझे वालमार्टचे अकाउंटचा बॅलन्स निगेटिव्ह दाखवल्याने व त्या इसमाने ‘अधिक रक्कमेची मागणी केल्याने मी त्यास यापेक्षा जास्त रक्कम गंतवणुक करू शकत नाही असे म्हणाल्या नंतर ते मी गुंतविलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागल्याने ते माझी फसवणुक करीत असल्याचे माझे लक्षात आल्याने त्यांचे विरूध्द रितसर फिर्याद दाखल करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पीआय विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रानगट, पोलीस नाईक वडेकर करीत आहेत.
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र
