
सरपंचांच्या मारहाणीचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यागंकडून निषेध
शिक्रापूर ( प्रतिनिधी ): येथील सरपंच रमेश गडदे यांना गावातील काही नागरिकांकडून जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करण्यात आल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी निषेध करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे
याबाबत उद्धव झोडगे, विशाल झोडगे,अभी सोळुंके,सुनील शिंदे अनिकेत राजगुरू, या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. उपसरपंच विशाल खरपुडे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे,त्रिनयन कळमकर,उषा राऊत,मोहिनी मांढरे,यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे,यांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
प्रतिनिधी सचिन दगडे शिक्रापूर