
शिक्रापूर ( सचिन दगडे वार्ताहर ) शिक्रापूर : पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जातेगाव बुद्रुक येथील एका विद्यालयाच्या समोर गोंधळ घालून भांडण करणारे युवकांना पोलिसांनी ताब्यात घेता गुन्हे दाखल केले आहेत शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची करडी नजर आहे गैरकृत्य करणाऱ्यांवर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली आहे….
पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे म्हणाले की,किरकोळ वादातून कोठेही शाळा,महाविद्यालय, परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,असे कृत्य करू नये शालेय जीवनात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास पुढे खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे शालेय युवकांनी शिक्षणावर भर देऊन कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन यांनी केले आहे.