श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथील होतकरू तरुणांनी MIDC मध्ये कायम स्वरुपी नोकऱ्या मिळण्यासाठी केली विशेष ग्रामसभेची मागणी
राजगुरुनगर प्रतिनिधी (दि-१डिसेंबर)

Spread the love

श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथील होतकरू तरुणांनी MIDC मध्ये कायम स्वरुपी नोकऱ्या मिळण्यासाठी केली विशेष ग्रामसभेची मागणी
राजगुरुनगर प्रतिनिधी (दि-१डिसेंबर) श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथील होतकरू तरुणांनी व काही ग्रामस्थांनी निमगाव परिसरात असणाऱ्या मुलांना एमआयडीसी मध्ये कायम स्वरूपी नोकरी मिळावी म्हणून विशेष ग्रामसभेची मागणी केली असून त्यात खालील प्रमाणे विषय घेण्यास सांगितले आहे. १)निमगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ए सी झेड/ एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या व नवीन येणाऱ्या कंपन्यांमध्ये कायम स्वरूपी ३०% नोकरी स्थानिक भूमीतपत्रांना मिळावी. २)निमगाव ग्रामपंचायत येथील ए सी झेड/ एमआयडीसी मधील कंपन्यांमधील व्यावसायिक ठेकेदारी 100% स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने मिळावी. ३) निमगाव तेथील कंपन्यांचा एकूण असणाऱ्या सीएसआर फंडा पैकी कमीत कमी पाच ते दहा टक्के वाटा निमगावच्या विकासासाठी मिळाला पाहिजे या मागण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे म्हणून गावातील श्री.सदानंद तांबे, श्री.राजकुमार (महाराज )राऊत, श्री.महिंद्र काळे श्री.राहुल सोनवणे, अमर कांताराम शिंदे, गणेश भोंडवे इतर होतकरू तरुण व गावातील ग्रामस्थांनी केली. हे निवेदन सरपंच सौ शुभांगी बाळासाहेब भालेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.हर्षवर्धन मोहन शिंदे, सौ.रूपाली महेंद्र काळे व ग्रामसेवक श्री.रमेश खैरे यांनी स्वीकारले.M I D C ने आमच्या जमिनी घेताना सांगितले होते की या M I D C मथ्ये गावातील मुलांना प्रथम प्राधान्याने नोकरी दिली जाईल पण असे काहीही झाले नाही.आज आमच्या गावात खुप बेरोजगार मुले आहेत त्यांचा भविष्याचा विचार करून हे निवेदन दिले असल्याचे निवेदन देणार्या ग्रामस्थांनी सांगितले.निवेदनावर गावातील २८० ग्रामस्थांच्या सह्या असून लवकरात लवकर ग्रामसभा घेण्याची निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे. निवेदन स्वीकारताना सरपंच सौ शुभांगी बाळासाहेब भालेकर यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे निवेदनात दिलेल्या विषयानुसार लवकरात लवकर विशेष ग्रामसभा घेण्यात येईल व त्याप्रमाणे गावातील नोटीस बोर्ड व स्पीकरवर पुकारून जाहीर केले जाईल तसेच आपण सर्व तरुणांनी जास्तीत जास्त ग्रामस्थ या ग्रामसभेसाठी कसे उपस्थित राहतील याचे नियोजन करावे.
माननीय मनोहर गोरगल्ले उपसंपादक अस्सल न्यूज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents