

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक
राजगुरुनगर प्रतिनिधी (दि १० डिसेंबर ) पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. ते एका कार्यक्रमातून निघत असताना अचानक त्यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकली. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या अन्य साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप कोणीही या शाईफेकीची जबाबदारी स्वीकारली नाही.शाळा किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता? महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. त्यावेळी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आणि चालविल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादंग उठले आहे. शनिवारी त्याच रागातून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमातून बाहेर पडत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.
माननीय मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी