दिनांक; ९ डिसेंबर २०२२
इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी – श्री. नितीन गोरे ( प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सदस्य )

Spread the love

प्रेस नोट दिनांक; ९ डिसेंबर २०२२
इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी – श्री. नितीन गोरे ( प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सदस्य )

पिंपरी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य सदस्य नितीन गोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह (आयएएस) यांची शुक्रवारी महापालिकेत भेट घेतली,इंद्रायणी नदी प्रदूषण संदर्भात वर्तमान पत्रात रोज बातम्या येत आहेत, यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी जवळील इंद्रयाणीच्या प्रवाह मध्ये प्रदूषण जास्त आढळते,खेड तालुक्यातील आळंदी,चाकण पंचक्रोशी परिसरातील गावांना याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.आळंदीमध्ये भक्ताना दूषित पानी प्यावे लागत आहे,त्यात स्नान करावे लागत आहे.त्यामुळे भाविक भक्तांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
श्री. नितीन गोरे यांनी गेल्या पंढरवाड्यात चाकण औद्योगिक वसाहतीत प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण बैठकही घेतली होती,प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्याचा सदस्य या जबाबदारीने व खेड तालुक्यातील एक नागरिक म्हणून मी पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून त्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे.यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी असे त्यांनी आयुक्ताना निवेदन दिले आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महापालिका इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत ? याची सविस्तर माहिती मागितली आहे ,पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांच्याशी देखील यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली . लवकरच सर्व संबंधित संस्था,प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व एमआयडीसी मिळून इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याबाबत संयुक्त बैठक घेणार आहे असेही त्यांनी कळवले .

वरील बातमीस आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी ही विनंती !

                            नितीन  गुलाबराव गोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents