
श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण चे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री बाळासाहेब बबनराव गोतारणे सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने प्रशालेचे प्राचार्य श्री सुभाष गारगोटे, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार श्रीमती कविता गोरे ,असिस्टंट सेक्रेटरी श्री अनिल ठुबे,ग्रामीण संचालक श्री रामदास खाटमोडे,उपप्राचार्य श्री बाळासाहेब खामकर,श्री तुकाराम थोरात,पर्यवेक्षक श्री अण्णासाहेब कोडग,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.गोतारणे सरांनी 31 वर्षे 6 महिने व 12 दिवस एकूण सेवा झाली त्यानिमित्ताने शाळेला रु 31612 एवढी देणगी दिली.अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, शांत व संयमी तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.