व्यसनाला बदनाम करण्याची गरज*

Spread the love

व्यसनाला बदनाम करण्याची गरज*
– विशाल विमल

दारू पिणाऱ्या व्यक्तीचे वर्तन हे कधीही सामान्य नसते. दारू शरीरात गेल्यावर दारूमधील घटक आणि मेंदूतील संप्रेरक यांची प्रक्रिया घडते, म्हणून तर दारू प्यायल्यावर मनुष्य हालूडूलू लागतो, हे दारू पिणाऱ्याचे समोरून दिसणारे चित्र आहे. मात्र त्याच्या मेंदूच्या पातळीवर जे काही घडते ते भयंकर असते. विचार करणारा मेंदू बधिर होतो. यावर कुणी चर्चा करत नाही. उलट समाजातील काही बुद्धिवंतही दारू पितात, असे सांगून दारूचे समर्थन करतात. पण जे बुद्धिवंत दारू पितात, ते दारू प्यायले नाहीत तर अजून त्यांचा मेंदू विवेकी विचार करेल आणि अजून त्यांच्यातील तल्लखपणा उजळून दिसेल. काही जण म्हणतात की, थोडी दारू प्यायल्याने काही होत नाही, पण थोडी म्हणजे किती ? पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत जेव्हाकेव्हा प्यायले तेव्हा 5 एमएल प्यायले का ? थोडी प्यायल्याने डोळे लाल झाले नाहीत का ? घरी कुणाला अपशब्द बोलला नाहीत का ? पिलात म्हणून घरच्यांनी तोंडं मुरडली नाहीत का ? तर याची उत्तरं होय अशीच आहेत. म्हणजे दारू पिणे हे समर्थनीय नाही, हे यातून स्पष्ट होते. दारूचे वैशिष्ट्ये म्हणजे सेवनाचे अधिक्य वाढणे आणि पिण्याच्या अंतरातील वारंवारता कमी होणे हे होय. पहिला दारूचा घोट घेणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या वेळी अधिक घोट घेण्याची इच्छा होते, हे दारूचे पहिले वैशिष्ट्ये आहे. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा दारू पिण्यात जे अंतर असते, यापेक्षा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा दारू पिण्यातील अंतर कमी होते, हे दुसरे वैशिष्ट्ये आहे.

व्यसन हा मानसिक आजार आहे. व्यसन या संस्कृत शब्दाचा अर्थ संकट असा आहे. बेचैनी, अस्वस्थता, शारीरिक व्याधी, मानसिक अस्थिरता, निराशा आदी लक्षणे दारूचे तीव्र व्यसन असलेल्या व्यक्तींना दारू न दिल्यास त्यांच्यामध्ये दिसतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मनाचा तोल जाऊन त्यांच्याकडून टाळेबंदीच्या काळात भांडणे, शिवीगाळ, लैगिंक अत्याचार आदी कृत्य घडली आहेत. म्हणजे दारू जेवढी घातक ठरु शकते, तितकेच घातक दुष्परिणाम व्यसनी व्यक्तीला दारू न मिळाल्यास घडतात. त्यामुळे पूर्णतः दारू बंद करणे देखील घातक ठरते. दारू बंद करण्यासाठी जो पर्याय असतो, तो म्हणजे क्लिनिकल आणि सायकॉलॉजीकल उपचार हा आहे. ते उपचार टाळेबंदीच्या काळात अवलंबण्याची गरज होती. जे लोक व्यसन करतात त्यांच्यावर उपचार करता येतात. मात्र, 100 व्यसनी लोकांपैकी 8 ते 9 टक्के लोकांचे व्यसन कोणत्याच उपचाराने सुटत नाही. त्यामुळे व्यसनापासून दूरच रहावे. एकदा दारू पिल्याने काही होत नाही. मी व्यसन बंद करू शकतो. बिअर आरोग्याला चांगली असते. वाईन ही दारू नाही. दारू पिले की फ्रेश वाटते. दारू पिल्याने दुःख आणि चिंता कमी होते, हे सर्व खोटे समज आहेत. दारूचा पहिला घोट घेणाऱ्या 100 पैकी 15 जण व्यसनी बनतात, हे लक्षात ठेवावे. व्यसनाचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेतच. पण व्यसन हे विकास आणि विवेक विरोधी आहे. व्यसनी व्यक्ती स्वतःचा, कुटुंबाचा पर्यायी देशाचा विकास करू शकत नाही. व्यसनी व्यक्ती चोऱ्या, गुन्हे, अत्याचार करते आणि अपघातात जीवही जातो. वेळ, श्रम, बुद्धी, पैशाची नासाडी व्यसनात होते. टाळेबंदीमुळे हाताला काम नाही आणि हातात पैसेही नाहीत. पण घरातील महिला संसारला ऐनवेळी चार पैसे लागतात म्हणून बाजूला तरी ठेवतात. आता त्या पैशावर नजर ठेवून दारूसाठी पैसे हवेत म्हणून पुरुष घरातील महिलांना भयंकर त्रास देणार हे उघड आहे. आणि इतक्या दिवसांच्या विरहानंतर जास्त दारू प्यायल्याने पुन्हा त्याचा त्रासही भयंकर होणार आहे.

काही जण म्हणतात की, टाळेबंदीमध्ये दारू काळ्या बाजाराने विकली जात होती. त्यापेक्षा आता रीतसर विक्री सुरू आहे हे योग्यच आहे. मात्र या म्हणण्यात तथ्य जरी असले तरी आजही काळाबाजर थांबलाय असे म्हणता येणार नाही. काळाबाजार नियंत्रणात आणणं, हाच यावरचा उपाय आहे. पण असे उपाय एक दिवसात अंमलात येत नसतात आणि त्याचे सकारात्मक परिणामही लगेच दिसत नसतात. सरकार हे नेहमीच दारू उत्पादन आणि विक्रीला प्रोत्साहन देत आले आहे. आता तर टाळेबंदी असतानाही दारूची दुकाने खुली केली आहेत. मात्र तिथे शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम तळीराम पाळत नसल्याने दीड महिन्यात जो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे साधले ते काही दिवसात बिघडणार आहे.
समाजातील सर्वक्षेत्रातील अनेक व्यक्ती दारूचे व्यसन करतात, जाहीर ठिकानी करतात, व्यसनाची जाहिरात करतात, त्यामुळे दारूचे व्यसन चुकीचे नसून ते प्रतिष्ठेचे असल्याचे सर्वसामान्यांचा समज झाला आहे. त्यामुळे दारूच्या व्यसनाने मानसिक आजारी झालेल्या व्यक्तीला बदनाम न करता दारूची बदनामी करून दारूची प्रतिष्ठा कमी करण्याची गरज आहे. त्याबाबत प्रबोधन झाले पाहिजे. त्यामुळे नवीन पिढी व्यसनाकडे वळणार नाही. सरकारने व्यसनाच्या पदार्थीची निर्मिती, वितरण यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनविरोधी कायदे अंमलात आणावेत. व्यसनी पदार्थ विक्रीतून सरकारला जो महसूल मिळतो, त्यावरील परावलंबित्व कमी करावे, आदी प्रतिबंधात्मक कामे सरकारने करावीत. नागरिक आणि महिलांनी व्यसनाला प्रतिकार करण्यासाठी उभे राहिले पाहिजे. गावातील 50 टक्के महिलांच्या सह्यानी ते कायदेशीर दुकान बंद करता येते. नवीन दुकान चालू करताना देखील महिलांची परवानगी सरकारने घेतल्याशिवाय परवाने देऊ नयेत. हा लोकशाही मार्ग झाला. मात्र ज्यांना दारू प्यायची आहे , त्यांनी ती कुठूनही उपलब्ध करून प्यावी, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. दारू पिणे हे शून्य टक्के समर्थनीय असले तरी व्यक्तीस्वातंत्र्य जपले पाहिजे. व्यसनमुक्तीच्या कामाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चतुसूत्री सांगते. व्यसनविरोधी प्रबोधन, प्रतिकार, प्रतिबंध आणि उपचार या चतु:सूत्रीनुसार काम केल्यास व्यसनाधीनता

स्थळ-नगरपरिषद चाकण समोर..
विषेश सहकार्य -सीईओ चाकण…

उपस्थिती…
राहुल देशमुख -अध्यक्ष -कै.कु रेश्मा(मनुताई)मेमोरियल ट्रस्ट
राजेंद्र जगनाडे -राष्ट्र सेवा दल
प्रमोद खामकर -संचालक(कल्प फिटनेस क्लब)
राहुल बर्डे सर (ईगल स्पोकन इंग्लिश क्लासेस)
विशाखा खामकर( बॅंक अधिकारी)
किशोर भुजबळ (सा. कार्यकर्ते)
नगरपरिषद कर्मचारी वर्ग
अनिकेत शेवकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents