दिनांक 9 12 2022 रोजी सुनील दत्तात्रय गोरे व 59 वर्ष राहणार चित्राई मळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांचे गट नंबर 20 34 मधील उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू असताना दिनांक नऊ डिसेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ऊसतोड कामगारांना मानवी हाडांचा सांगाडा, कवटी उसाच्या सरीमध्ये पडलेला दिसल्याने

Spread the love

दिनांक 9 12 2022 रोजी सुनील दत्तात्रय गोरे व 59 वर्ष राहणार चित्राई मळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांचे गट नंबर 20 34 मधील उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू असताना दिनांक नऊ डिसेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ऊसतोड कामगारांना मानवी हाडांचा सांगाडा, कवटी उसाच्या सरीमध्ये पडलेला दिसल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर सदर ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली असता तेथे उसाच्या शेतामध्ये मानवी डोक्याची कवटी हाताचे व मांडीचे हाड डोक्याच्या केसांचा लांब कुंजका व त्या ठिकाणावरून जवळच पिवळसर रंगाचा लेडीज गाऊन व कुजलेल्या अवस्थेतील लालसर रंगाचा मातीत भरलेला कपडा दिसून आलेला आहे त्यावरून सदर कवटी व हाडांचे सांगाडे हे महिलेचे असण्याचे शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदर हाडे सुमारे एक वर्षापासून त्या ठिकाणी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चाकण शहर व परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे चाकण पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात येते की सुमारे एक वर्षापासून कोणी गाऊन घातलेल्या अवस्थेत महिला बेपत्ता असल्यास, वय अंदाजे 30 ते 40 या वजनाची कोणी महिला बेपत्ता असल्यास त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांच्याशी संपर्क साधावा.
Psi Vikas Madake 9850229316
चाकण पोलीस स्टेशन9699608976

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents