चाकणमध्ये भाजपाकडून अजित पवार यांचा जाहिर निषेध.

Spread the love

चाकणमध्ये भाजपाकडून अजित पवार यांचा जाहिर निषेध.

चाकण, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे खळबळजनक विधान केले. या त्यांच्या विधानाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले असून चाकण शहरात देखील भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाकडून जाहिर निषेध करण्यात आला. चाकणमधील जय महाराष्ट्र चौकात संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत अजित पवार यांचा धिक्कार केला.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीवर माथा टेकवून माफी मागावी अशी मागणी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव यांनी केली. भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी कधी शरद पवार तर कधी अजित पवार हे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विषयी विपर्यास निर्माण करणारी विधाने करत असतात असे मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आर्यकर्ते शौर्य दिनाच्या काळातच कधी गावात बंद पाळतात तर कधी अशांतता माजेल असे विधान करतात असे विचार भाजपा चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे यांनी मांडले. तर जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी यांनी अजित पवार यांनी माफी नाही मागितली तर शिवशंभू प्रेमी आणखी तिव्र आंदोलन करतील असे सांगितले.

चाकण पोलीस अधिकारी यांना निषेधाचे व गुन्हा नोंद करण्याबाबतचे निवेदन युवा मोर्चा चाकण शहर व भाजप चाकण शहर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जीवन साखरे, आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, चाकण शहर माजी अध्यक्ष अजय जगनाडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे, युवा मोर्चा जिल्हा सचिव शाम पुसतकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष व सरपंच चेतन बर्गे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रतिक गंभीर, वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष योगेश देशमुख, उद्योग आघाडी शहर अध्यक्ष विक्रम परदेशी, शहर सरचिटणीस अर्जून बोऱ्हाडे, दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लहू लांडे, शहर उपाध्यक्ष मनोज बिसणारे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रशांत शेवकरी, युवा वॉरियर्स श्रीकांत परदेशी, दत्ता परदेशी, रवि परदेशी, गणेश नाईक, निलेश रसाळ, मंगेश घुगे, संकेत कोकाटे आदी अनेक युवा वॉरियर्स व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents