
चाकण नगरपरिषद,चाकण कर्मचारी प्रशिक्षण व उत्कृष्ट कर्मचारी प्रमाणपत्र वाटप सोहळा
चाकण नगर परिषद , टेनेको इंडिया प्रा. ली., कारपे संस्था व एन. डी. के .यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण शहरात आमचं चाकण ,स्वच्छ चाकण ,निरोगी चाकण अभियानांतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 च्या अनुषंगाने आज दिनांक :- 03/01/2023 वर मंगळवार रोजी कर्मचारी प्रशिक्षण व उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सुनील बल्लाळ सर, उपमुख्याधिकारी श्री पांढरपट्टे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी बल्लाळ सर, उपमुख्याधिकारी पांढरपट्टे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , मुख्याधिकारी श्री बल्लाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये आपले चाकण शहर सर्वोत्तम कामगिरी करून पहिल्या 10 रँकिंक मध्ये यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे , व त्या अनुषंगाने सर्वजण मिळून काम पार पाडू व उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या कारपे संस्था करत असलेल्या प्रत्येक कामास वेळोवेळी सहकार्य केले जाईल असे यावेळी सांगितले ,
कारपे समन्वयक सुरेश घोरपडे सर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सविस्तरपणे प्रशिक्षण दिले, प्रशिक्षना दरम्यान घोरपडे सर यांनी कर्मचाऱ्यांना कामामध्ये येणाऱ्या अडचणी, व त्यावर कशाप्रकारे मात करावे तसेच कामामध्ये सातत्य कसे राखून ठेवावे या बद्दल सविस्तर माहिती पी पी टी द्वारे माहिती दिली तसच नगर परिषदेचे सुपरवायझर यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन केले. यावेळी नगर परिषदेचे नोडल अधिकारी कवीता पाटिल मॅडम तसेच शहर समन्वयक कश्मीरा बडगूजर,अभय मेंढे नगरपरिषदेचे सुपरवायझर विजय भोसले,शंकर भीसणारे तसेच एन डी के मेनेजर बनकर सर तसेच नगर परिषदेच्या महिला सुपरवायझर मंगल गायकवाड मॅडम,स्वच्छतादुत ज्योती गरुड तसेच कारपे समन्वयक सुरेश घोरपडे सर, शिवाजी दामोदरे,महादेव चांदगुडे,रेश्मा ढावरे,अतुल वाघमारे, मल्हारी पंडित व सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.