

युवकांमध्ये मूल्य संस्कार रुजवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रभावी माध्यम -बाबाजी काळे जिल्हा परिषद सदस्य पुणे
नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै भागूबाई पिंगळे कला वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे(NSS )विशेष हिवाळी शिबिर दि-27/12/2022 ते दि-02/01/2023 या कालावधीत जैदवाडी ता- खेड जि- पुणे या ठिकाणी पार पडले सदर शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून जैदवाडी गावात ग्राम स्वच्छता, स्मशानभूमी परिसर स्वच्छता,जलसंवर्धन, ग्राम सर्वेक्षण, श्रमदान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वनराई बंधारा इत्यादी सारखी भरीव समाज उपयोगी कामे करण्यात आली सात दिवसांच्या या कालावधीत विशेष व्याख्यानांच्या आयोजन करण्यात आले त्यात युवकांसाठी संत हे आदर्श, पर्यावरण आणि मानवता, समाज माध्यमे आणि युवक , एच आय व्ही जनजागृती, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक या विषयांवर तज्ञांची मार्गदर्शन पर व्याख्याने संपन्न झाली त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व पथ नाट्याच्या माध्यमातून गावामध्ये जनजागृती करण्यात आली विशेष हिवाळी शिबिराच्या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 02/01 /2023 रोजी बाबाजी काळे जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या उपस्थितीत उपस्थित पार पडला समारोपप्रसंगी युवकांमध्ये मूल्य संस्कार रुजवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन बाबाजी काळे यांनी केले कार्यक्रमास नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ एन डी पिंगळे, सचिव शितल टिळेकर व संचालक मच्छिंद्रशेठ भुजबळ,संस्था प्रतिनिधी डॉ शोभा इंगवले महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष बुट्टे , जैदवाडी गावचे सरपंच शितलताई विकास जैद, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर दुधवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा भरत बिरंगळ, प्रा रोहिणी सोनवणे, प्रा राम मुद्गुल,प्रा धनंजय रसाळ,प्रा जावेद तांबोळी, रंजना सावंत उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष बुट्टे यांनी तर सूत्रसंचालन ह.भ.प सुभाष महाराज जैद आणि कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा गणेश शिंदे यांनी केले सदर सात दिवसाचा शिबिर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जैदवाडी गावचे विद्यमान सरपंच सौ शितलताई विकास जैद तसेच उद्योगपती विकासदादा जैद यांचे विशेष सहकार्य लाभले