

आमचं चाकण, कचरा मुक्त चाकण, निरोगी चाकण
जनजागृती मोहीम
चाकण नगर परिषद, टेनेको इंडिया प्रा. ली व कारपे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शून्य कचरा मोहीम अंतर्गत.
न. प. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहरातील ऐश्वर्या आंगण या सोसायटी मधून सर्वप्रथम जनजागृती मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे सर्वप्रथम येथे घंटागाडीचे भुजबळ ताई आणि सर्व महिला यांच्या शुभ हस्ते घंटागाडी ला हार घालून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांनी सर्वप्रथम सर्व महिला व नागरिक पुरुष यांना कचरा वर्गीकरण बद्दल मार्गदर्शन केले यामध्ये आपण आपला कचरा वेगळा करून देणे हे खूप आवश्यक आहे त्याचे फायदे आणि तोटे सरांनी समजावून सांगितले आहे .
यानंतर कारपे प्रकल्प समन्वयक सुरेश घोरपडे सर यांनी कचरा वर्गीकरण हा कसा करावा करायचा आहे आणि का करावा याबद्दल सर्वप्रथम सर्व माहिती समजावून सांगितली कचऱ्याचे किती प्रकारांमध्ये आपणाला वर्गीकरण करायचे आहे त्यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, हानिकारक कचरा आणि ई वेस्ट ( इलेक्ट्रॉनिक वेस्ट ) कचरा अशा चार प्रकारांमध्ये आपणाला घरातूनच कचरा वेगवेगळा करायचा आहे_ आपल्या घंटागाडीला सेटअप लावला जाईल आपण नियमित प्रमाणे हा कचरा वेगळा करून दिला पाहिजे अशा प्रकारचा प्रात्यक्षिक डेमो या ठिकाणी दाखवला आहे.
यावेळी न. प. कर्मचारी अधिकारी नोडल अधिकारी कविता पाटील, शहर समन्वयक अभय मेंढे, सुपरवायझर विजय भोसले, एन डी के व्यवस्थापक दत्तात्रय बनकर, नरेंद्र भोसले, कदम, कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी कारपे प्रकल्प समन्वयक सुरेश घोरपडे, संघ प्रमुख शिवाजी दामोदर, रेश्मा ढावरे, मल्हारी पंडित, चांदगुडे महादेव, अतुल वाघमारे उपस्थित होते