
शिक्रापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली
शिक्रापूर : शिक्रापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली त्यावेळेस प्रमुख उपस्थिती मध्ये सौं.ज्योती आहेरकर पोलीस नाईक शिक्रापूर पोलीस स्टेशन कु.सचिन दगडे, श्री. गजानन इंगळे, शुभम जामगे, माजी सैनिक श्री. लालचंद भुजबळ, सौं.छाया सकट सामाजिक कार्यकर्ते व शिक्रापूर पोलीस स्टेशन दक्षता कमिटी सौं.हेमा सिंग, रंजना हिवराळे,सौं.सोनाली गायकवाड,सौं.मनीषा पडवळ, सौं.संगीता भुजबळ, साक्षी पलखाले श्रुतिका मावळे दिपाली मिरजकर अलका जगदाळे आधी महिला उपस्थिती मध्ये होते त्यावेळेस सौं. ज्योती आहेरकर मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच कु.सचिन दगडे,यांनी महिलांना महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले
सावित्रीबाई जोतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
शिक्रापूर प्रतिनिधी सचिन दगडे