

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने दर्पण दिन साजरा
चाकण- भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने ‘अटल युवा पर्व’ अंतर्गत ६ जानेवारी ‘दर्पण दिन’ निमित्त खेड तालुका मंडलातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पुणे जिल्हा परिषद भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील, भाजपा खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, भाजयुमो पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील व भाजयुमो जिल्हा प्रभारी अजित कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मध्यवर्ती कार्यालय चाकण येथे आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा अध्यात्मिक व समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपा चाकण शहर प्रभारी अध्यक्ष प्रीतम शिंदे, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, भाजपा माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खरमाटे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भाजयुमो जिल्हा चिटणीस शाम पुसदकर, भाजयुमो खेड तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, भाजयुमो खेड तालुका उपाध्यक्ष नसीम पठाण, भाजयुमो चाकण शहराध्यक्ष प्रतीक गंभीर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या व पत्रकारांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेतल्या व याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस तथा दर्पण दिन जिल्हा संयोजक संदेश जाधव, भाजयुमो जिल्हा चिटणीस शाम पुसदकर, भाजयुमो खेड तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, भाजयुमो खेड तालुका उपाध्यक्ष नसीम पठाण, भाजयुमो चाकण शहराध्यक्ष प्रतीक गंभीर या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.