
स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 3.0
विविध स्पर्धा बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळा
अंतर्गत नगर परिषद चाकण न प मुख्याधिकारी सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ स्पर्धा मध्ये रांगोळी स्पर्धा , स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा , निबंध स्पर्धा , म्युरल स्पर्धा , झिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आज नवोन्मेष विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय चाकण ने या स्पर्धेत सहभाग घेत विद्यार्थी , विद्यार्थिनी यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी यांनी आपली कलाकृती सादर केली आहे.
त्यानुसार प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन न प मुख्याधिकारी श्री सुनील बल्लाळ सर आणि संस्थेचे संचालक डॉक्टर आरगडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तेव्हा ,उपमुख्याधिकारी श्री राजेंद्र पांढरपट्टे सर उपस्थित होते
यावेळी मुख्याधिकारी बल्लाळ सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये उंच भरारी घेत असताना आपला पोपटपंची होता कामा नये असे उदाहरण देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच आपल्या चाकण शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत शून्य मोहीम कचरा मोहीम अंतर्गत कारपे संस्था काम करत आहे तेव्हा सर्वांनी या कार्याला सहकार्य करावे असे आव्हान केले आहेत आणि आपल्या घरातूनच कचरा वेगवेगळ्या करूनच नगरपरिषदेला द्यावा तेव्हा आपले शहर सुंदर चाकण निरोगी चाकण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तेव्हा सर्व सहभागी विद्यार्थिनी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच शाळेतील मुख्याध्यापक अर्चना बिरदवडे यांचाही प्रमाणपत्राने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं, शिक्षक व शिक्षिका यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा ही सहभाग प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे ._
यावेळी नोडल अधिकारी कविता पाटील वरिष्ठ लिपिक विजय भोंडवे शहर समन्वयक कश्मिरा बडगुजर, शहर सल्लागार अभय मेंढे , मुकादम विजय भोसले, दत्तात्रय गोरे सामना पत्रकार बंडू भोई ,पुणे न्यूज सम्राट राऊत ,अभि सोनवणे एन डी के सुपरवायझर आकाश कदम, सुपरवायझर नरेंद्र भोसले, कारपे प्रतिनिधी शिवाजी दामोदरे , रेश्मा ढावरे,चांदगुडे, महादेव, मल्हारी पंडित, अतुल वाघमारे, सर्वजण उपस्थित होते.
प्रतिनिधी सचिन राक्षे