
चांगल्या विचारातून चांगली कृती घडते – माधुरी कचाटे (कॉन्स्टेबल चाकण पोलिस स्टेशन)
चाकण : स्रियांच्या सर्वांगीण विकासासाठि शिक्षण महत्वाचे, आजच्या आधुनिक युगात विद्यार्थिनींच्या सोमोर अनेक प्रलोभन येतात परंतु त्या प्रलोभनानां बळी न पडता थोडा विचार करून मग निर्णय घ्या. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतः मधे बदल घडविन्यासाठी, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगली स्री होण्यासाठी चांगले विचार ठेवने महत्वाचे असे मत चाकण पोलिस स्टेशन च्या कॉन्स्टेबल कचाटे यांनी व्यक्त केले.
चाकण (ता.खेड) येथे कै.भागुबाई पिंगळे कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालयात ‘विद्यार्थिनी मंच’ या कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संतोष बुट्टे, चाकण पोलिस स्टेशन च्या सौ. आशा तळेकर, महाविद्यालयाचे प्रा. भरत बिरंगळ, प्रा.जावेद तंबोळी, प्रा.रामदास मुदगुले, प्रा. रोहिणी सोनवणे, प्रा.गणेश शिंदे प्रा. अनुजा प्रा.वैष्णवी मावळे, MESCO च्या सौ.सरुबाई घुमटकर उपस्तीत होते.
प्रा.सोनवणे यांनी प्रस्ताविक तर प्रा.मावळे यांनी सूत्रसंचलन केले व विद्यार्थीनी तेजस्विनी चौगुले यांनी आभार मानले.
प्रतिनिधी सचिन राक्षे