
हिवरे कुंभार शाळेचे नाव विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत
शिक्रापूर : हिवरे कुंभार ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे 23 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले असताना त्यापैकी 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून 9
विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादी मध्ये झळकले असल्याची माहिती मुख्याध्यापक शुकराज पंचरास यांनी दिली आहे.
हिवरे कुंभार ता.शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी पात्र ठरले असून या विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वी मांदळे 276 गुण, वेदिका तांबे 276 गुण, सुयश फ़ंड 268 गुण, ओम साळुंखे 268 गुण, लोकेश भंडारी 266 गुण, आदित्य जगताप 252 गुण, श्रेयस साळूंखे 246 गुण, कार्तिकी शितोळे 244 गुण, वेदिका थोरात 242 गुण, अशा प्रकारे गुण मिळवत विध्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवले आहे