
दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी मुंबई मंत्रालय येथे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापना लवकर व्हावी याची लवकर अंमलबजावणी करावी व राज्यातील रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस ऐतिहासिक शासन निर्णय व्हावा यासाठी आज मुंबई मंत्रालय येथे समक्ष भेटून स्मरण पत्र दिले यावेळी आदरणीय फडणवीस साहेब म्हणाले की आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची कार्यवाही सुरू आहे येणाऱ्या थोड्याच दिवसांमध्ये याबाबत निर्णय होईल असा विश्वास आदरणीय फडणवीस साहेब यांनी दिला.
प्रतिनिधी :-सुदर्शन मंडले
