

पिंपरी चिंचवड पोलीस
विभाग
रस्ता सुरक्षा अभियान सन २०२३ अंतर्गत इनोव्हेटिव इंग्लीश स्कूल मधीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
दि.१६/०१/२०२४
आयुक्तालय, चाकण वाहतुक
रस्ता सुरक्षा अभियान सन २०२३ अंतर्गत चाकण वाहतुक विभागाचे पोलीस उप-निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर झोल, पोना / अमोल गव्हाणे, मपोहवा / स्मीता गाढवे यांनी चाकण येथील इनोव्हटीव्ह इंग्लीश स्कुल येथे भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकवृंद याची बैठक घेऊन त्यांना वाहतुकीचे नियम समजावुन सांगुन, वाहन चालविताना कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी तसेच शाळेत येता जात रस्ता ओलांडताना घ्यावयाची दक्षता, अपघाताची कारणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अन्चना मंगलुर, सहशिक्षक बन्मई खलदर ह्या हजर होत्या. सदर वेळी पोलीस उप-निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर झोल यांनी विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसन करण्यात आले.
सदरची कामगिरी मा. श्री. वियकुमार चौबे, पोलीस आयुक्त सो, मा.श्री. मनोज लोहीया, सह. पोलीस आयुक्त सो. मा. डॉ. संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त गो, मा. श्री. विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त सो, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त वाहतुक विभाग, पिंपरी चिंचवड यांच मार्गदर्शनाखाली श्री. शंकरराव डामसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर झोल, पोलीस उप-निरीक्षक, मपोहवा / स्मीता गाढवे, पोशि/ अमोल गव्हाणे चाकण वाहतुक विभाग पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी केली आहे.
