

प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील दोंदे येथील
भैरवनाथ विद्यालयांच्या आदर्श मुख्याध्यापिका डॉ सौ. नंदा विठ्ठल भोर यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापिका हा पुरस्कार दापोली येथील कृषी विद्यापीठातील विशवेश्वर सभागृहात मा. श्री. उदयजी सामंत ( उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य ) आणि मा. श्री.योगेशदादा कदम (राज्यमंत्री, गृह,महसूल ग्रामीण विभाग )मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे ( आमदार, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ ) यांचे हस्ते १३/०४/२०२५ रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्या प्रसंगी दोंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. नंदकुमार कोहिणकर (सचिव )श्री. भरत उढाणे (सहसचिव), श्री. विठ्ठल मारुती भोर (राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. मुख्याध्यापक )सर्व भैरवनाथ विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षण सेवक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल डॉ. नंदा भोर यांचे खेड तालुक्यातून नव्हे तर पंचक्रोशीतून सर्व स्तरावरून कौतुक होत असून सदिच्छा व शुभेच्छा वर्षाव होत आहे.