


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी येथे ह भ प लक्ष्मण महाराज रेटवडे यांचे लिखित माऊली अमृत प्रसाद पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ :०० वाजता रोकडोबा देवस्थान रेटवडी येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे नियोजन टाटा मोटर्स वारकरी संघटना यांनी केले होते . संघटनेच्या वतीने हभप लक्ष्मण महाराज रेटवडे यांचा सन्मान करण्यात आला .
या निमित्ताने रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमिताने टाटा मोटर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी अजित पायगुडे
हभप सुरेश महाराज दरवडे ,
हभप किसन महाराज धंद्रे ,
अनिकेत गावडे ,नंदू गीते,
सदाशिव बनसोडे ,तुकाराम चंदीले,
आत्माराम हिंगे , जितेंद्र वाघ , सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब रेटवडे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते
संत ज्ञानेश्वर माऊली धार्मिक फंड चिखली व टाटा मोटर्स वारकरी संघटना यांनी पुस्तक संकलन प्रकाशन सौजन्य सहकार्य केले. रेटवडी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या आहेत.