
खेड तालुक्यातील मांजरेवाडी पिंपळ या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. संतोष महाराज बढेकर (संपर्क क्रमांक ७७१९०७६६५६/९९७५९५०८२३) यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. किर्तन हा विनोदाचा भाग नसून संस्कृती जोपासण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. भक्ती ही सर्वात महान अशी शक्ती आहे. नामस्मरण हीच खरी भक्ती आहे. लौकिक जगात संसार , पद प्रतिष्ठा, माया , व्यवहार आहे पण अलौकिक जगामध्ये परमार्थ , परमात्मा वारस नोंद आहे. लौकिक जगात परमार्थ रडवतो आणि अलौकिक जगात परमार्थ तुम्हाला ज्ञान देतो. भक्ती म्हणजे काय शुद्ध आचरण, नामस्मरण, आई-वडिलांचा आदर करणे हीच भगवंताला अपेक्षित भक्ती आहे. जी महिला घेते डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियाची मदर. घरी खातो ते अन्न, हरिनामात खातो तो प्रसाद. भगवा म्हणजे काय भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. हनुमान रायाने रामरायाची कशी भक्ती केली आहे. साध्या आणि सरळ सोप्या भाषेत भाविक भक्तांना अनेक वेगवेगळे दाखले देऊन समजाविले. आई जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे यांचे आचरण विचरण मुलांना सांगा आणि शिक्षणाबरोबर अध्यात्माचे धडे सुद्धा द्यावेत. लहान मुलांना मोबाईल देऊ नका. मोटरसायकल चालवायला देऊ नका. लेक वाचवा लेक शिकवा. संस्कार युक्त मुले घडवा. असा तोला मोलाचा संदेश सर्व भाविक भक्तांना दिला. भक्तीचे विविध दाखले देऊन मांजरेवाडी आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक भक्तांची मने त्यांनी जिंकली. महाराजांना गायक, पखवाद , पेटीवादक, टाळकरी, विणेकरी यांची मोलाची साथ लाभली. मांजरेवाडी पिंपळ धर्म मलघेवाडी आणि पंचक्रोशीतील आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन मांजरेवाडी (पिंपळ),धर्म मलघेवाडी गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी यांनी उत्कृष्ट केले आहे. सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.