गुंतवणुकीचे बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ऑनलाईन २.५२.९६,४०६/- रुपयांची फसवणुक करणारे आंतरराष्ट्रीय टोळीशी संपर्कात असलेल्या आरोपीस सायबर पोलीसांकडुन ४८ तासात अटक करुन गुन्हा उघड.

Spread the love
प्रतिनिधी.लहू लांडे
सांगवी येथे राहणारे जेष्ठ नागरीकास फेसबुकवरुन अनोळखी इसमाने ऑनलाईन ट्रेडींग संर्दभात लिंक पाठवुन त्याद्वारे व्हॉटसअपग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर त्यांना त्यांचे HSBC ट्रेडींग नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगुन सदर अॅप्लिकेशन व प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटींग, स्टॉक मार्केटींगमध्ये गुंतवणुक केल्यास घांगला परतावा मिळवुन देण्याचे अगीष दाखवुन विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले व त्यांना गुंतवणुकीवर मोठा नफा दाखविण्यात येत होता. त्यानंतर सदर गुंतवणुक केलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता अनोळखी आरोपींनी त्यांना ब्रोकरेज फि, हाय ट्रान्ट्रॅक्शन फि, सेक्युरीटी डीपॉझिट, थर्ड पार्टी हाय ट्रान्नॅक्शन विड्रोअल प्लॅटफार्म असे वेगवेगळे चार्जेस भरण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांनी भरलेली एकुण रक्कम रु. २,५२,९६,४०६/- परत न मिळाल्याने त्यांची सदर रक्कमेची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दि.२४/०३/२०२५ रोजी सायबर पोलीस ठाणे गुरनं. १२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३३५ (अ) (१), ३३६(३). ३३९. ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक ही मोठ्या स्वरुपाची असल्याने व अशा प्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिबंध होणेकामी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करणेकामी गा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे यांनी आदेशित केले होते. त्याप्रमाणे गा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदीप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाले हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. त्याप्रमाणे सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता व उपासकामी सपोनि प्रविण स्वामी व पोउपनि. सागर पोमण, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि विदया पाटील यांची पथके तयार करुन गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन करुन कामाचे विभाजन केले होते.

त्याप्रमाणे तपास करीत असताना पोउनि, विदया पाटील यांना गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या बैंक अकाउंट, त्याचा ट्रेल यासंबंधाने माहीती काढण्याबाबत सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी माहीती घेतली असता त्यापैकी एक अकाऊंट हे बीड जिल्हयातील इसमाचे असल्याबाबत माहिती मिळाल्याने अधिक तांत्रिक तपास करुन सपोनि. स्वामी, पोउनि, विदया पाटील, पोउपनि वैभव पाटील यांची पथके तयार करुन तपास करता सदर अकाऊंटधारकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचे बैंक अकाऊंट हे त्याचे ओळखीचा इसम नामे बाळासाहेब सखाराम चौरे, वय ३२ वर्षे, मु.पो जिवाची वाडी, ता. केज, जि. बिड याने गेमिंगच्या फंडाचे कारण सांगुन नेले असल्याची माहीती दिली. त्यावरुन तात्काळ त्याची तांत्रिक माहीती घेवुन त्याचे तपासकामी मा. वरिष्ठांचे परवानगीने पथक बीड येथे पाठवुन बाळासाहेब सखाराम चौरे, वय ३२ वर्षे, मु.पो जिवाची वाडी, ता. केंज, जि. बिड यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सायबर पोलीस ठाणे येथे तपास करता त्याने स्वतः दुबई येथे जावुन दुबई येथे राहत असलेले इतर गुन्हयात पाहीजे असलेला एक भारतीय गणेश काळे व एक पाकिस्तानी नागरीक असलेल्या साथीदारांशी संगणमत करुन बैंक अकाऊंट प्राप्त करुन कमिशनवर त्यांना पुरवित होता. तसेच सदर अकाऊंट त्यांचे नेपाळी साथीदाराचे मदतीने चालवुन त्यांचेसह सदर अकाऊंटचा फसवणुकीसाठी वापर करुन युएसडीटी या क्रिप्टो करन्सीचे माध्यमातुन स्वतः आर्थिक फायदा मिळवित असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस दासखल गुन्हयात दि. २६/०३/२०२५ रोजी १९.२० वा. अटक करण्यात आली आहे.

तपासामध्ये आरोपी यांचेकडुन मिळालेल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे बैंक अकाऊटची माहीती मिळून आली असुन आरोपी यांचे दुबई, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर संबध असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असुन आरोपी यांचेकडे मिळून आलेल्या बैंक अकाऊंटविरुध्द इतर राज्यात एनसीसीआरपी पोर्टलच्या तक्रारी

मिळुन आलेल्या असुन त्याअनुषंगाने तसेच फसवणुकीचे रक्कमेबाबत सखोल तपास चालु आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि, प्रविण स्वामी, पोउपनि, सागर पोमण, पोउनि वैभव पाटील, पोउनि. विदया पाटील, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, अतुल लोखंडे, निलेश देशमुख, दिपक माने, ज्ञानेश्वर गवळी, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्नील खणसे, प्रितम भालेराव, अभिजीत उकिरडे, संदिप टेकाळे, सुरंजन चव्हाण, परशुराम चव्हाण, पंकज घोटे, महेश मोटकर, संतोष सपकाळ, शिवाजी बनसोडे, मोनिका चित्तेवार, शुभांगी ढोबळे, दिपाली चव्हाण, नम्रता कांबळे, सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

(संदिप डोईफोडे)

पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents