


प्रतिनिधी दत्ता भगत /सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी येथे श्री रोकडोबा महाराज यात्रेच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह भ प अनिल महाराज रेटवडे(रेटवडी) यांचे सुश्राव्य असे कीर्तन सेवा संपन्न झाली. किर्तन हा विनोदाचा विषय नाही. कीर्तनांमध्ये नामस्मरण आणि भक्ती या दोन गोष्टी फार महत्त्वाचे आहे. प्रतिज्ञा, प्रयत्न उदारता ,धनवान ,तेजा, शितल आणि पवित्र यामध्ये संत फार महत्त्वाचे आहे. कीर्तनामध्ये जर मानसिकता ठेवली तरच कीर्तन समजेल. शास्त्राने सुद्धा चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत .आज्ञा, अनुज्ञा ,अभ्यता आणि उपदेश. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांनाच आहे . नामस्मरण हीच खरी भक्ती आहे. लेक वाचवा लेक शिकवा . लहान मुलांच्या हातात मोबाईल आणि मोटरसायकल देऊ नये असा तोला मोलाचा संदेश महाराजांनी दिला आहे. या कीर्तन सेवेमध्ये गायक , पखवाद वादक,पेटी टाळकरी यांचे मोलाची साथ लाभली. कीर्तनाचे सौजन्य रेटवडी गावच्या कन्या कु. प्रियंका किसन हिंगे (वन विभाग अधिकारी) यांनी दिले. अन्नदान पंक्तीचे सौजन्य माणिकराव वाबळे पा. मा अध्यक्ष, उत्तम किसन बबन थिटे ,दशरथ काळे, शरद काका भालेकर मा. सरपंच, संतोषशेठ घनवट ,श्रीधर घुले, (सरपंच काटेवाडी बारामती) सोमनाथ शेठ पवळे ,ज्ञानेश्वर पवार ,डॉक्टर श्रीअंश कोल्हाळ आकोले यांनी दिले. हरिजागर श्री खंडेराया भजनी मंडळ पेठ, ढोरेवाडी, तुकाईवाडी, टाकळकरवाडी ,श्रीराम भजनी मंडळ रेटवडी यांचा झाला. महाराजांनी पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक भक्तांना कीर्तनामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे साक्षात दर्शन घडविले. सर्व भाविक भक्तांकडून आणि ग्रामस्थांकडून महाराजांचे कौतुक होत आहे. रेटवडी आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अखंड हरिनाम सप्ताह मंडळ, गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी चोख पार पाडले आहे. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार विजेते शरद काका वाबळे पा. यांनी केले.