


प्रतिनिधी दत्ता भगत
खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी या ठिकाणी श्री रोकडोबा महाराज यात्रेच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हभप पोपट महाराज राक्षे यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. संत कोणाला म्हणावे आणि देव कोणाला म्हणावे. संताची व्याख्या त्यांनी सांगितले आहे. ज्याच्या जीवनात अंत नाही. त्याला संत म्हणायचे. देव आणि संत यात काय फरक आहे. देव आणि संत दोघेही रूपे बदलतात. संतांना जन्म घेणे ही माहित आहे. मृत्यू पण माहित आहे. माणसाला न्यावयास काळ येतो आणि संतांना न्यावयास देव येतो. संगत कशी करावी आणि कोणाशी करावी या संदर्भामध्ये त्यांनी अनेक दृष्टांत आणि दाखले देऊन सर्व भाविक भक्तांची मने जिंकली. कीर्तनाचे सौजन्य सुभाष पवळे चेअरमन, आनंदराव काळे, शिवाजीराव वाबळे पा. ,संतोष डूबे ,शिवाजी पवळे, वामनराव पवळे ,रामकृष्ण वाबळे पा., मोहन पवळे, अर्जुन पवळे यांनी दिले पंक्तीसाठी अन्नदान द्वारकानाथ टिजगे मा. पंचायत समिती .खेड, गुलाब पवळे, निलेश पवळे ,योगेश पवळे हॉटेल ओम साई ,किरण पवार ,विशाल भगत, मल्हारी भगत, रामदास भगत, अशोक भगत ,रोहिदास भगत ,राजेंद्र भगत, प्रज्वल गिरीगोसावी, हरिश्चंद्र पवळे गॅस एजन्सी ,विलास काटकर, सागर जाधव आणि भावेश पाटोळे यांनी दिले. या कीर्तन रुपीस सेवेमध्ये गायक ,पेटीवादक, पखवाज वादक, टाळकरी आणि विणेकरी यांची मोलाची साथ लाभली. यावेळी रेटवडी आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन रुपी सेवा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचा वाटप करण्यात आला. किर्तन रुपी सेवा श्रवण करण्यासाठी भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार विजेते शरद काका वाबळे पा. यांनी केले.